आर्थिक स्तिथी


        जिल्ह्यातील शेतकरी बाांधवाांना सावकारी कर्जाच्या पाशातून मोकळे करण्याच्या हेतुने त्यांना कृषी उत्पादनासाठी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने दि जळगाांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची २७ मे १९१६ रोजी स्थापना करण्याांत आली. दि.३१ मार्च १९१७ रोजी पूर्ण झालेल्या पहिल्या आर्थिक वर्षात बँकेने ३५ सहकारी संस्था व ११२ व्यक्ती सभासदांची नोंदणी केली.

      जळगाांव जिल्हा बँकेच्या आज जिल्ह्यात मुख्य कचेरीसह २३४ शाखा, ५ विस्तारीत कक्षासह कार्यरत आहेत. ग्रामीण पातळीवरील (Gross Root Level) सहकारी संस्थाना कर्ज  पुरवठा सुलभतेने करता यावा. जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला ठेवी, कर्जे व बॅंकिगच्या आधुनिक सर्व सेवा उपलब्ध व्हाव्यात पर्यायाने ठेवीत वाढ व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बँकेने शाखाांचे जाळे विणलेले आहे.

     वरील आकडेवारी पाहता बँकेच्या भागभांडवलात वाढ झालेली दिसते. रीझर्व्ह बँकेचे सुचनेनुसार बँके ने भांडवलाची पर्याप्तता (CRAR) १०.२५% राखलेला आहे. तसेच बँकेचे नेटवर्क रु.१२८.७६ कोटी इतके झालेले आहे. बँकेस सन २०१७-२०१८ च्या सनदी लेखापालाांच्या वैधानिक तपासणी अहवालानुसार “ ब “ ऑडीट वर्ग देण्यात आलेला आहे.

  • बँकेस स्थापन होवून १०२ वषा पूर्ण झालेले आहेत.
  • बँकेस आरबीआयकडून बँकिंग व्यवसाय परवाना प्राप्त झाला आहे.
  • बँकेने सर्व २३९ शाखा संगणीकृत करुन सीबीएस प्रणालीव्दारे कामकाज सुरु केलेले आहे.
  • शेतकरी बाांधवांना शेतीकर्ज रुपे किसान कार्डव्दारे यशस्वीपणे वाटप केलेले आहे.
  • रीझर्व्ह बँकेच्या कायद्यानुसार बँकेस एनडीटीएलच्या ४% रोखता व १९.५% तरलता राखावी लागते. आज पर्यंत बँकेने एकाही दिवशी या कायद्याचे उल्लंघन केलेले नाही.
  • दि.२८.११.२०१८ अखेर बँकेची एकूण गुंतवणूक १२०१.६७ कोटी आहे.यामध्ये केंद्र व राज्य शासनाचे कर्ज रोखे रु.७२१.७८ कोटीचे बँके ने घेतलेले आहे व उर्वरीत गुंतवणूक राज्य सहकारी बँक मुंबई येथे केलेली आहे..
  • बँक गेल्या ५ वर्षात जिल्ह्यातील १.५० लाख ते २.०० लाख शेतकर्यांना शेती पिककर्ज वाटप करीत आहे.
  • रुपे डेबीट कार्ड व रुपे किसान क्रेडीट कार्ड धारकाांना नॅशनल पेमेंट कॉर्पोशन ऑफ इंडिया व दि. न्यु.इंडिया इन्शुरन्स सोबत करार करुन सदर विमा योजना अंतरगत कार्ड धारकास रुपये एक लाख वैयक्तिक अपघात विमा लागू आहे.
  • महाराष्ट्र व गुजरात राज्यामध्ये जिल्हा बँकामार्फत एटीएम कार्डाव्दारे सर्वात जास्त व्यवहार करणारी बँक म्हणून आमच्या बँकेस एनसीपीआर् कडून आलेल्या रिपोर्टनुसार सर्वत्र टेक्नालॉजी या कंपनीकडून नागपूर येथे गौरवण्यात आलेले आहे.
  • बँकिंग फ्रंटीअर्से मार्फत बँकेस सवोत्कृष्ट डेबीट कार्ड वाटप संदर्भात एफसीबीए २०१८ अंतर्गत दिल्ली येथे पुरस्कार मिळालेला आहे.