इतिहास

बँकेचा १०० वर्षाचा इतिहास

जळगाव जिल्ह्याच्या सर्व मराठी भाषिक, गरीब,गरजू उपेक्षित माणसांचा सर्वांगीण विकास व समृद्धी होण्याच्या दृष्टीने व सर्वच स्तरावरील जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी दि खान्देश डीस्ट्रीक्ट सेन्ट्रल को. ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना दि.१९ मे १९१६ रोजी जळगाव येथील नामांकित वकील व प्रमुख प्रवर्तक मा. दत्तात्रय गोविंद जुवेकर व इतर सर्व समाज सेवक संचालक यांनी केली.

दि.२७ मे १९१६ रोजी पूर्ण खान्देश जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोंदणी झाली व सरकार नियुक्त पहिले ९ सदस्यांचे संचालक मंडळ अस्तित्वात आले.

बँकेचे पहिले संचालक मा. दत्तात्रय गोविंद जुवेकर यांची नेमणूक करण्यात आली.

बँकेचा व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीने संस्था सभासद म्हणून बोदवड सह.सोसायटीने पहिला शेअर दि. ३१ जुलै १९१६ रोजी घेतला.

सन १९१६-१७ मध्ये ३५ संस्था व ११२ व्यक्ती असे एकूण १४७ बँकेचे सभासद होते. वसूल भाग भांडवल रु. २६००० गोळा झालेले होते.

बँकेची स्थापना झाली त्यावेळेस व्यक्ती व संस्था सभासद मिळून बँकेचे एकूण १४७ सभासद होते. सन १९५१ मध्ये ३२०२, सन १९६६ मध्ये ४५०३ तर नोव्हेंबर २०१५ रोजी बँकेची एकूण सभासद संख्या ७४५८ असून पैकी व्यक्ती सभासद संख्या २६२४ आहे.

बँकेची पहिली शाखा सप्टेंबर १९२३ मध्ये पाचोरा येथे सुरु करण्यात आली. व सन १९३५ पर्यंत मुख्य कार्यालयासह बँकेच्या ८ शाखा कार्यान्वित झाल्या.

बँकेने जून १९१९ मध्ये गव्हमेंट सर्वेन्ट को. ऑपरेटिव्ह सोसायटीचे इमारतीत रु.७५/- वार्षिक भाड्याने बँकेचे मुख्य कार्यालय सुरु केले. सन १९३२-३३ मध्ये बँकेने रु. ४९२३३/- खर्च करून स्वतःची मुख्य कार्यालयासाठी घडीव दगडाची बांधकाम केली. म्हणून जिल्हा बँक बोली भाषेत “दगडी बँक” म्हणून ओळखली जाते.

१०० वर्षापूर्वी लावलेल्या इवल्याश्या रोपट्याचे आज बलाढ्य वटवृक्षात रुपांतर झालेले आहे. आज बँकेच्या स्वताच्या मालकीच्या ५० इमारती व ५ बखळ प्लॉट आहे.

सन १९९० मध्ये बँकेने रु.२ कोटी ३२ लाख खर्च करून भव्य नाट्यगृहसाहित बँकेची प्रशासकीय इमारत बांधकाम केली.

बँकेस भारतीय रिझर्व बँकेने दि.२८ मार्च २०१२ रोजी बँकिंग व्यवसाय परवाना दिलेला आहे.

बँकेवर एप्रिल २००३ ते डिसेम्बर २००८ या कालावधीमध्ये प्रशासकीय राजवट होती.

भाग भांडवल:- बँक स्थापनेवेळी बँकेचे भाग भांडवल रु.२६०००/- होते, तर नोव्हेंबर २०१५ अखेर रु. १७९ कोटी ३५ लाख इतके झालेले आहे.

निधी:- सन १९१७-१८ मध्ये बँकेचे एकूण निधी रु.८७३, सन १९२२-२३ मध्ये रु.१६१७५/-, सन १९५१ मध्ये रु.१५ लाख ९५ हजार तर नोव्हेंबर २०१५ अखेर रु. १८० कोटी ५२ लाख आहे.

ठेवी :- सन १९१७-१८ मध्ये बँकेच्या एकूण ठेवी रु.५५६८२/- होत्या. सन १९२२-२३ मध्ये रु.८,५९,२२१/- सन १९५१ मध्ये रु.१ कोटी ८७ लाख ९९ हजार ठेवी होत्या तर नोव्हेंबर २०१५ अखेर बँकेच्या एकूण ठेवी रु.२३३५/- कोटीच्या आहेत.

बाहेरील कर्ज:- बँकेने सुरुवातीला सन १९१८-१९ मध्ये मुंबई बँकेकडून रु. ८५ हजार कर्ज उचल केलेली आहे. तर सन १९२२-२३ मध्ये रु. ४ लाख १२ हजार, सन १९५० मध्ये रु.७ लाख ५३ हजार तर नोव्हेंबर २०१५ अखेर रु. ६७३ कोटी कर्जे घेतलेली आहे.

गुंतवणूक:- सन १९२९-३० या वर्षात बँकेची एकूण गुंतवणूक रु. १४ लाख २१ हजार, सन १९५० मध्ये रु. ७१ लाख ८० हजार, सन १९६६ मध्ये रु. २ कोटी ५१ लाख २५ हजार तर नोव्हेंबर २०१५ अखेर रु. ७८५ कोटींची गुतवणूक केलेली आहे.

येनेकर्ज :- बँकेने सुरुवातीला सन १९१७-१८ मध्ये दिलेल्या कर्जाची येणेबाकी रु.१६५४००/-, सन १९२२-२३ मध्ये रु.९६५४७४/- सन १९५१ मध्ये रु. ९७ लाख ५० हजार येणे बाकी होती. तर नोव्हेंबर २०१५ अखेर रु.२३५० कोटी येणेबाकी आहे.

खेळते भांडवल:- बँकेचे सन १९१६-१७ मध्ये खेळते भांडवल रु.९३०७५/-, सन १९२४-२५ मध्ये रु.१३ लाख ३६ हजार तर बँकेच्या स्थापनेस ५० वर्षे पूर्ण झाली त्यावेळेस सन १९६६ मध्ये रु. ९ कोटी २१ लाख ४० हजार खेळते भांडवल असून नोव्हेंबर २०१५ अखेर रु. ३५६४ कोटी इतके झालेले आहे.

नफा:- बँकेस सुरवातीच्या वर्षी सन १९१६-१७ मध्ये रु.९६/- एवढा नफा झालेला आहे. तर सन १९५१ मध्ये रु.२ लाख कोटी निव्वळ नफा झालेला होता. तर ३१ मार्च २०१५ रोजी बँकेस रु.२ कोटी ८५ लाख निव्वळ नफा झालेला आहे.

ऑडीट वर्ग:- बँकेस गत सतत तीन वर्षापासून “ब” ऑडीट वर्ग मिळालेला आहे.