बँके विषयी

बँकेने सर्व शाखा  संगणकीय करून सीबीएस प्रणालीद्वारे कामकाज सुरू केलेले आहे.

बँकेने NEFT व RTGS मार्फत फंड ट्रान्सफर व बँकेच्या खातेदारांसाठी SMS सुविधा सुरू केलेली आहे.

बँकेने एमएसटीसी लिमिटेड, मुंबई यांच्या मार्फत ई-टेनडरिंग द्वारे खरेदी व विक्री करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

शेतकरी बांधवाच्या उत्पन्नात भरीव वाढ होणेसाठी बँकेने पॉलीहाऊस / शेड – नेट, सौर ऊर्जा पंप व शेट कुंपण योजना राबविलेली आहे.

राष्ट्रीयकृत /खाजगी बँकामार्फत पगार होत असलेल्या केंद्र व राज्य शासकीय पगारदार कर्मचारी / सार्वजनिक कंपनीतील कर्मचारी / शासकीय अनुदानित प्राथमिक शाळा / माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयातील कायम कर्मचार्‍यांना मध्यम मुदत रु ५ लाख कर्ज धोरण राबविलेले आहे.

बँकेत कमी कर्मचारी वर्ग असताना देखील ग्राहकांना चांगली सेवा दिलेली आहे व देत आहोत.

शेतकरी बांधवांना शेतीकर्ज किसान कार्ड (ATM) द्वारे यशस्वी वाटप केलेले आहे.

बँकेच्या सन्माननीय ग्राहकांसाठी EMV Debit card चे वाटप केले जात आहे.

किसान कार्ड व EMV Debit कार्डवरून ग्राहकांना POS माशिनवर खरेदी E-Com  द्वारे Shopping ऑनलाइन खरेदी करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

ग्राहकांच्या  सेवेसाठी बँकेच्या शाखांमधून कुठल्याही बँकेच्या खात्यांमध्ये IMPS सेवेद्वारे ट्रान्सफरची सुविधा लवकरच सुरू करीत आहोत.

रुपे डेबिट कार्ड व रुपे किसान क्रेडिट कार्ड धारकांना नॅशनल पेमेंट कोर्पोरेशन ऑफ इंडिया व न्यू . इंडिया इन्शुरन्स कंपनी सोबत करार करून सदर विमा योजने अंतर्गत कार्डधारकांना रुपये १ लाख वैयक्तिक अपघात विमा लागू आहे. गतवर्षात दोन शेतकर्यांना या योजने अंतर्गत प्रत्येकी रुपये १ लाख विमा भरपाई मिळालेली आहे.

बँकिंग फ्रंटीअर्स मार्फत बँकेस सर्वोत्कृष्ट डेबिट कार्ड वाटप संदर्भात एफसीबी २०१८ अंतर्गत पुरस्कार मिळालेला आहे.

महाराष्ट्र व गुजरात राज्यामध्ये जिल्हा बँकामार्फत एटीएम कार्डद्वारे सर्वात जास्त व्यवहार करणारी बँक म्हणून आपल्या बँकेस एनसीपीआय कडून आलेल्या  रिपोर्टणूसार सर्वत्र टेक्नॉलॉंजी या कंपनी कडून गौरवण्यात आलेले आहे. तसेच बँकेस भारता मध्ये सदर बाबतीत ५० वा क्रमांक मिळालेला असून महाराष्ट्रा मध्ये प्रथम क्रमांकावर आहे.