दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपले स्वागत करीत आहे.


१ ) चालू ठेव
  • ज्या खातेदारांना आपल्या खात्यावरील व्यवहार मोठ्या प्रमाणात करावे लागतात, रक्कम रोज द्यावी घ्यावी लागते, अशा प्रकारच्या खातेदारांना, या ठेव खात्याचा फार उपयोग होतो.
  • १) या खात्यावरील रक्कम दिवसातून कितीही वेळेस ठेवता - काढता येते.
  • २) हे खाते वापरणे व्यापारी, उद्योजक यांना सोईचे असते. बहुतांश व्यवहार चेकने केले जातात.
  • ३) या खात्यावरील रक्कमेचा बँकेस गुंतवणूक करण्याच्यादृष्टीने फारसा उपयोग होत नसल्याने या खात्यावर व्याज दिले जात नाही.
  • ४) या खात्याच्या वापरावरील नियम ठरविण्याचे सर्व अधिकार बँकेकडे राखीव आहेत.
  • बँकेत चालू ठेव खाते उघडण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
    • अ) बँकेस मान्य असलेली व्यक्ती.
    • ब) कोणाही दोन किंवा अधिक व्यक्तींना संयुक्त नावाने,
    • क) सोल प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप फर्म, कंपनी, सहकारी संस्था, इतर संस्था, धर्मदाय संस्था, असोसिएशन, फर्म, शासकीय व निमशासकीय कार्यालये (सोसायटी), ट्रस्ट इत्यादी नावाने.
    • २) चालू खाते उघडण्यासाठी व्यक्ती किंवा संस्था यांचेसाठी बँकेने निरनिराळे अर्जाचे नमुने तयार केलेले असतात. योग्य तो फार्म भरून आणि त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे (KYC) जोडून अर्ज सादर करावा.
  • २ ) बचत ठेव
    • बचत ठेवी ह्या बँकेच्या एकूण ठेवींमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे. मध्यमवर्गीय व कनिष्ठ उत्पन्न गटातील व्यक्तींना या ठेवींचा उपयोग होतो व बचतीची सवय लागते. या गटातील व्यक्ती सर्व साधारणपणे चालू उत्पन्नातून काही बचत करतात व भविष्यकालीन गरजांसाठी ती वापरतात. या बचतीवर काही प्रमाणात व्याज मिळावे अशीही अपेक्षा असते. बँकेच्या दृष्टीने या खात्यावरील ठेवीतील रक्कम सहसा एकदम काढून घेतली जात नसल्याने, बरीच रक्कम शिल्लक राहते. तिचा फायदेशीर गुंतवणूकीत उपयोग करता येतो. म्हणूनच या ठेवींवर व्याज देणे शक्य होते. असे असले तरी रक्कम केव्हाही काढून घेतली जाण्याची शक्यता असल्याने एकूण बचत ठेवींच्या काही विशिष्ट प्रमाणात बँकेमध्ये शिल्लक रक्कम ठेवावी लागते. बँकेने मान्य केलेल्या कोणत्याही अठरा वर्षावरील व्यक्तीला बचत ठेवीचे खाते उघडता येते. परंतु खाते उघडणे किंवा नाकारणे हा बँकेचा अधिकार राहिल. बचत ठेव खात्यावरील रक्कम आठवड्यातून दोन वेळा काढणेची सवलत असते किंवा वर्षातून शंभर वेळा रक्कम काढता येते. बचत ठेव खात्यावर दैनंदिन शिल्लक बाकीवर व्याज आकारणी केली जाते. व्याजाची रक्कम वर्षातून २ वेळा म्हणजे फेब्रुवारी व ऑगस्ट महिन्यात ग्राहकांच्या खात्यात जमा केली जाते.
    ३ ) मुदत ठेव (Term Deposit)
    • बँकेमध्ये ठेवी ठेवणाऱ्या ग्राहकांना सुरक्षितता, गोपनीयता या बरोबरच व्यक्तीच्या उत्पन्नाची शाश्वती हवी असते. अधिक काळ बँकेकडे राहणाऱ्या ठेवी म्हणजेच अल्प मुदत व मुदत ठेवीवर बँक अधिक दराने व्याज देते व त्यातूनच ठेवीदारांना निश्चित उत्पन्न मिळू शकते. मुदतीच्या ठेवी बँकेच्यादृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत.१५ दिवस व त्यापेक्षा जास्त कालावधीची ठेव ठेवल्यास त्याला मुदत ठेव समजली जाते व त्यानुसार आपल्या बँकेत १५ दिवस ते ४५ दिवस, ४६ ते ९० दिवस, ९१ ते १८० दिवस, १८१ ते १ वर्षापर्यंत, १ वर्षापेक्षा जास्त ते २ वर्ष, व २ वर्षापेक्षा जास्त अशा विविध मुदतीच्या मुदत ठेवी स्वीकारल्या जातात. ज्येष्ठ नागरिकांना ०.५०% जादा दराने व्याज देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
    ४ ) आवर्त ठेव
    • काही खातेदारांना एक रक्कमी मोठी रक्कम मुदत ठेवीला ठेवणे शक्य होत नाही. त्यांचेसाठी आवर्ती ठेव खाते उघडून दरमहा ठराविक रक्कम बँकेत जमा करून मुदत ठेवीसाठी असलेल्या व्याज दराचा लाभ देता येतो. या खात्याचे सर्वसाधारण नियम पुढीलप्रमाणे आहेत.
    • १) बँकेला मान्य असलेल्या कोणत्याही व्यक्तीस आवर्त ठेव खाते उघडता येईल.
    • २) महिन्याच्या कोणत्याही तारखेस हे खाते सुरु करता येईल. खाते उघडतांना दरमहा भरावयाची रक्कम कमीत कमी रु.५०/- अथवा त्याचपटीत असली पाहिजे.
    • ३) सदर खात्याचा कालावधी १ ते ५ वर्षे असेल.
    • ४) खाते उघडतांना खातेदाराने नमुन्यामध्ये अर्ज भरून दिला पाहिजे.
    • ५) हे खाते व्यक्तीशः अथवा संयुक्तपणे उघडता येईल.
    • जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध ठेव योजनाबद्दल आणि अटी शर्तीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आजच आपल्या जवळच्या शाखेस भेट द्या.