बँक रूपे ईएमव्ही कॉन्टॅक्टलेस किसान कार्ड म्हणजे काय?
दैनंदिन खरेदीसाठी कॉन्टॅक्टलेस कार्ड एक जलद आणि सोयीस्कर मार्ग आहे. यामध्ये एक सुरक्षित,
कॉन्टॅक्टलेस (संपर्करहित) चिप तंत्रज्ञान आहे ज्यामुळे तुम्हाला इतरांना अत्यंत कमी वेळेत
रक्कम अदा करता येऊन आपला वेळ वाचविता येतो.
रूपे ईएमव्ही कॉन्टॅक्टलेस किसान कार्ड कसे कार्य करते?
- १) विक्रीच्या ठिकाणी (POS) संपर्करहित लोगो शोधा.
- २) कॅशियर तुमची खरेदी रक्कम टर्मिनलमध्ये टाकेल. ही रक्कम कॉन्टॅक्टलेस रीडरवर
प्रदर्शित केली जाईल.
- ३) तुमचे कार्ड रीडर किंवा POS जवळ ठेवा. (जिथून कॉन्टॅक्टलेस लोगो दिसतो तेथून ४
सेमीपेक्षा कमी अंतरावर).
- ४) व्यवहार पूर्ण झाल्यावर हिरवे इंडिकेटर लाईट लागतील किंवा बीप आवाज येईल. व्यवहार
पूर्ण झाल्याचे दर्शविणारा संदेश स्क्रीनवर देखील प्रदर्शित केला जाईल. रु.५०००/-
पेक्षा कमी रकमेसाठी पिन आवश्यक नाही.
कृपया लक्षात की आपल्या भारतात, किसान
कार्ड कॉन्टॅक्टलेस मोडद्वारे पिन न टाकता पेमेंट करणेस्तव एका व्यवहारासाठी
जास्तीत जास्त रु.५,०००/- इतक्या रकमेचीच परवानगी आहे.
फायदे काय आहेत?
- कॉन्टॅक्टलेस पेमेंट सुविधा खास तुमच्यासाठी वेगवान आणि सुरक्षित व्यवहारांकरीता
डिझाइन केलेली आहे.
- कोणत्याही ठिकाणी आपले कार्ड इतर मशीन मध्ये टाकणे, स्वाइप करणे, पिन प्रविष्ट करणेची
आवश्यकता नाही. तुम्ही काही सेकंदात पेमेंट करून मोकळे व्हाल. फास्ट-फूड जॉइंट्स,
पेट्रोल पंप, चित्रपटगृह इत्यादी ठिकाणी वापरासाठी अत्यंत सोयीस्कर आहे.
- कॉन्टॅक्टलेस म्हणजेच संपर्करहित असल्यामुळे आपले कार्ड हे नेहमी आपल्या हातातच राहते.
त्यामुळे बनावट / स्किमिंगद्वारे फसवणुकीचा आणि कार्ड गमावण्याचा धोका मोठ्या प्रमाणात
कमी होतो. कॉन्टॅक्टलेस कार्डची स्वतःची अद्वितीय, अंगभूत सिक्रेट की असल्यामुळे ते
अधिक सुरक्षित आहे.
- रोजच्या कमी रकमेच्या खरेदीसाठी तुम्हाला रोख नोट / नाणी सोबत बाळगण्याची गरज नाही.
यामुळे खर्चाचा हिशेब ठेवणेही सोपे जाते.
कॉन्टॅक्टलेस व्यवहाराच्या रकमेची मर्यादा आहे का? मी माझ्या किसान कार्डची मर्यादा ठरवू
शकतो का?
कॉन्टॅक्टलेस मोडद्वारे एका व्यवहारासाठी पेमेंट करणेसाठी भारतात जास्तीत जास्त रु.५,०००/-
च्या मर्यादेपर्यंतच परवानगी आहे. कोणत्याही रु. ५,०००/- पेक्षा जास्त रकमेच्या
व्यवहारासाठी तुम्हाला तुमचा किसान कार्ड पिन प्रदान करण्यास सांगितले जाईल. एका
कॉन्टॅक्टलेस व्यवहारासाठी ही कमाल मर्यादा सर्व ग्राहकांसाठी आहे. यापेक्षा जास्त मर्यादा
सेट करणे शक्य नाही.
या कॉन्टॅक्टलेस किसान कार्डसाठी एटीएम आणि इंटरनेट व्यवहारांच्या प्रक्रियेत काही फरक आहे
का?
एटीएम किंवा इंटरनेट व्यवहारांसह कार्ड नॉट प्रेझेंट प्रक्रियेत कोणताही फरक नाही. एटीएम
व्यवहारांसाठी तुम्हाला पिन प्रविष्ट करणे आवश्यक आहे आणि कार्ड नॉट प्रेझेंट व्यवहारासाठी
तुम्हाला तुमचा 3D Secure पिन किंवा ओटीपी प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
तुमच्या रूपे ईएमव्ही कॉन्टॅक्टलेस किसान कार्डासाठी मार्गदर्शक तत्वे आणि सुरक्षा
- कार्डाच्या पाठीमागील स्वाक्षरी पट्टीवर प्राप्त झाल्यावर लगेच स्वाक्षरी करा.
- तुमच्या पसंतीच्या नविन चार आकडी पिनमध्ये बनविण्यासाठी तुमचे कार्ड एनएफएस
नेटवर्कमधील कोणत्याही एका एटीएमवर तुमचे कार्ड त्वरीत वापरा.
- तुमचा पिन लक्षात ठेवा आणि पिन मेलर नष्ट करा.
- तुमचा पिन तुमच्या कार्डावर कधीच लिहू नका. पिन लिहून ठेवण्यापेक्षा लक्षात
ठेवा.
हे करा
- तुमचा पिन गुप्त ठेवा.
- तुम्ही तुमचा पिन नियमीतपणे बदलावा, प्राधान्यतः तो प्रत्येक तीन महिन्यांनी बदलावा.
- तुमचे कार्ड गहाळ किंवा चोरी झाल्यास आमच्या 9404334911, 9067334911 या ग्राहक सेवा
क्रमांकावर कामकाजाच्या दिवशी सकाळी 11.00 ते संध्याकाळी 6.00 या दरम्यान फोन करा किंवा
सर्वात जवळच्या शाखेला भेट द्या आणि तुमचे कार्ड अवरोधित करण्यासाठी विनंती करा.
- तुमचे कार्ड सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा.
- तुमचे कार्ड टीव्ही आणि चुंबकीय उत्पादनांपासून दूर ठेवा.
- जर तुमच्याकडे दोन कार्ड असतील, तर अशी काळजी घ्या की दोन्ही कार्डाच्या चुंबकीय
पट्ट्या एकमेकांवर घासणार नाहीत.
- पिन नंबर बदलण्यासाठी सर्वत्र कार्ड सेफ मोबाईल ॲप चा वापर करावा.
हे करू
नका
- तुमचे कार्ड कोणालाही देऊ नका.
- तुमचा पिन कोणालाही सांगू नका (कुटुंबातील सदस्य, आपली बँक किंवा बँकेचा कोणताही
कर्मचारी)
- तुमचे कार्ड कधीही दुर्लक्षित ठेऊ नका, तुमचे कार्ड अशा जागी ठेवा, जेथे तुम्हाला
हरवल्यास लगेच लक्षात येईल.
- एटीएम मध्ये कोणत्याही परिस्थितीत कोणाचीही मदत घेण्याचे टाळा.
- तुम्ही पिन चा टाकत असताना कोणालाही बघू देऊ नका. एटीएमवर तुम्ही तुमचा व्यवहार करताना
एकटेच आहात याची खात्री करावी.
- तुमच्या व्यवहाराच्या वर्धित सुरक्षिततेचा आनंद उपभोगण्यासाठी नेहमी आपले इएमव्ही चिप
कार्ड वापरा.
- अधिक सुरक्षिततेच्या दक्षतेसाठी चिप सक्षम केंद्रांवर तुमचे इएमव्ही चिप कार्ड स्वाईप
करू नका.
- कार्डाच्या मागील चुंबकीय पट्टी काढून टाकू नका किंवा त्यावर ओरखडा येऊ देऊ नका.
- कार्ड वाकवू नका.
- लक्षात ठेवा की, दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव तर्फे आर्थिक /
वैय्यक्तिक / किसान कार्डाशी संबंधित कोणत्याही माहितीची विचारणा फोन किंवा ईमेलद्वारा
कधीही करत नाही. म्हणून अश्या माहितीची विचारणा करणा-या फोन ईमेलना प्रतिसाद देऊ नका,
त्या फसव्या असू शकतात.
एटीएम वरील कार्डचा वापर
तुम्ही तुमचे कार्ड एनएफएस नेटवर्कमधील इतर कोणत्याही बँकेच्या एटीएम मध्ये वापरू शकता.
एटीएममध्ये RuPay लोगो असल्यास हा लोगो सूचित करतो की सदर एटीएम हे एनएफएस नेटवर्कमध्ये
आहे. येथे तुम्ही तुमचे कार्ड वापरू शकता. भारतभरात अशी २.६ लाख एटीएम आहेत.
- टप्पा 1: एटीएम स्लॉटमध्ये तुमचे कार्ड घाला. एटीएममध्ये डिप रीडर असल्यास, कार्ड
स्लॉटमध्ये घाला आणि परत खेचा. एटीएममध्ये मोटराइज्ड कार्ड रीडर असल्यास, व्यवहार पुर्ण
होईपर्यंत तुमचे कार्ड एटीएममध्ये राहील.
- टप्पा 2: एटीएम तुम्हाला तुमची पसंतीची भाषा निवडण्यासाठी सूचित करेल.
- टप्पा 3: पुढे, एटीएम तुम्हाला तुमचा पिन प्रविष्ट करण्यास सूचित करेल.
- टप्पा 4: तुमचा पिन बरोबर असल्यास, तुम्हाला पर्यायांची यादी दिली जाईल, उदा.: फास्ट
कॅश, कॅश पैसे काढणे, शिल्लक चौकशी, मिनी स्टेटमेंट, पिन बदलणे. तुमचा इच्छित व्यवहार
निवडा.
- टप्पा 5 रोख रक्कम काढण्याच्या वेळी, तुमचे दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
जळगाव मधील खात्यात सदर रक्कम ऑनलाइन नावे टाकली जाईल.
- टप्पा 6: मोटराइज्ड कार्ड रीडर असलेल्या एटीएममध्ये तुम्ही व्यवहार पूर्ण केल्यानंतर,
तुमचे कार्ड लवकरात लवकर बाहेर खेचा. ३० सेकंदात कार्ड बाहेर न काढल्यास ते एटीएमद्वारे
मशीनमध्येच ठेवले जाईल. असे झाल्यास कृपया एटीएम जोडलेल्या शाखेशी किंवा कार्ड जारी
करणाऱ्या शाखेशी संपर्क साधा.
सुचना
- तुम्ही तुमचे कार्ड कमीत कमी रु.१००/- पासून जास्तीजास्त तुमच्या कार्डाच्या
प्रकारानुसार विहीत मर्यादेपर्यंत रोख रक्कम काढण्यासाठी वापरू शकता. कृपया लागू
शुल्कासाठी टॅरिफ शिट पहा.
- एटीएम वर तुमचा पिन योग्यरित्या वापरा. जर र तुम्ही चूकीचा पिन सलग तीनवेळा नोंदवलात
तर तुमचे कार्ड एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येईल. अशा परिस्थितीत बँकेशी त्वरीत संपर्क
साधा.
- कार्डावरील कोणत्याही अनधिकृत व्यवहारांसाठी बँकेला जबाबदार धरता येणार नाही.
- महत्वपुर्णः आरबीआय आदेशाप्रमाणे एटीएममध्ये सोडून देण्यात आलेली कोणतीही रोख
रक्कम एटीएम मध्ये परत मागे घेतली जाणार नाही. तुम्ही न घेतलेली रोख रक्कम एटीएम
वापरण्याकरिता येणारे तुमचेनंतर येणारे व्यक्ती घेऊ शकतात. कोणत्याही आर्थिक
नुकसानीसाठी बँक जबाबदार असणार नाही.
व्यापारी अस्थापनांवर रूपे ईएमव्ही कॉन्टॅक्टलेस किसान कार्डाचा वापर
- टप्पा १ : रूपे लोगो असलेल्या व्यापारी अध्यापनांवर तुमचे कार्ड वापरू शकता.
- टप्पा २ : व्यापारी पीओएस टर्मिनलवर तुमचे कार्ड स्वाईप करेल आणि खरेदीची रक्कम त्यात
नोंदवेल.
- टप्पा ३ : तुम्हाला एक पिन पॅड देण्यात येईल. त्यात तुमचा पिन नोंदवा जो तुम्ही रोख
रक्कम काढण्यासाठी एटीएममध्ये वापरता.
- टप्पा ४: पीओएस टर्मिनल तुमचे दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव मधील
खात्यावर तुमच्या खरेदीची रक्कम नावे टाकून ( तुमच्या खात्यावर असलेल्या निधी
उपलब्धेच्य अधिन राहून) तुमच्या व्यवहारावर प्रक्रिया करेल आणि एक चार्ज स्लीप प्रिंट
करण्यात येईल.
- टप्पा ५: चार्ज स्लीप मधील रक्कम तपासून बघा आणि व्यापा-याच्या प्रतिवर स्वाक्षरी करा.
- टप्पा ६ः व्यापारी चार्ज स्लीप आणि कार्ड आपल्याला परत देईल.
रूपे ईएमव्ही कॉन्टॅक्टलेस किसान कार्डाचा ई-कॉमर्स / ऑनलाईन व्यवहारासाठी वापर
प्रथम खरेदीसाठी टप्पा- (ऑनलाईन रजिस्ट्रेशन) **
- व्यापा-याचे संकेतस्थळ उघडा, व्यापारीमाल / सेवा खरेदीसाठी / मिळवण्यासाठी निवड करा,
देण्यात आलेल्या पुढे / चेक आऊट वर क्लिक करावे लागते.
- पैमेंट पर्यायामध्ये मर्चंट पेजवर कार्डधारकाची माहिती नोंदवुन आणि तपशील सबमिट करावा
लागतो.
- रूपे किसान कार्डधारकाला बँकेकडे नोंदणीकृत असलेल्या मोबाईलवर एक वन टाईम पासवर्ड
येईल. कार्डधारकाला ओटीपी पेजवर पुनः निर्देषित करण्यात येते, देण्यात आलेल्या
जागेमध्ये तो ओटीपी नोंदवतो.
- पिन दाखल केल्यानंतर कार्डधारकाला व्यवहार यशस्वी असल्याचे सुचित करण्यात येईल. तसेच
त्याचे कार्ड ऑनलाईन व्यवहारांसाठी "नोंदणीकृत" म्हणून समजण्यात येईल.
- टिप: जर व्यवहार यशस्वी झाला तरच कार्ड/कार्डधारक ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी
नोंदणीकृत करण्यात येईल.
आपले रूपे ईएमव्ही कॉन्टॅक्टलेस किसान कार्ड माहित करून घ्या
पर्सनल आयडेंटीफिकेश नंबर (पिन):एटीएम आणि पीओएस टर्मिनलवर कार्डाचा वापरकरण्यासाठीचा
गुप्त चार आकडी क्रमांक.
कार्डाचा दर्शनी भाग
- १. किसान कार्ड क्रमांक: हा तुमचा १६- आकडी कार्ड क्रमांक आहे. कृपया ध्यानात
ठेवा की तुमच्या बँकेबरोबरच्या भविष्यातील सर्व पत्रव्यवहारांमध्ये ह्या क्रमांकाचा
उल्लेख करणे आपल्यासाठी आवश्यक आहे.
- २.तुमचे नाव: तुमचे किसान कार्ड वापरण्यासाठी फक्त तुम्हीच अधिकृत आहात.
वैय्यक्तिक कार्डाच्या बाबतीत, कृपया हे तपासून बघा की तुमचे नाव योग्यरित्या तुमच्या
रूपे किसान कार्डावर छापण्यात आलेले आहे. जर तसे नसेल, तर लवकरात लवकर तुमच्या शाखेशी
संपर्क साधा. (जर तुमचे कार्ड एक इन्स्टा कार्ड असेल, तर त्यावर कोणतेही नाव मुद्रित
नसेल)
- ३.समाप्तीची तारीख: रूपे किसान कार्ड ते आपल्याला मिळालेल्या तारखेपासून ते
कार्डावर नमूद केलेल्या वर्षाच्या महिन्याच्या शेवटच्या दिवसा पर्यंत वैध असेल,
- ४. रूपे लोगोः तुमचे रूपे किसान कार्ड भारतामध्ये रूपे लोगो प्रदर्शित एटीएम आणि
व्यापारी आस्थापनांमध्ये कार्यान्वित करण्यायोग्य आहे.
- ५. ईएमव्ही चिपः रूपे किसान कार्डामध्ये बसविण्यात आलेली चिप बनावट कार्ड आणि
फसवणूकीपासून रक्षण करण्यासाठी मदत करते.
- कार्डाचा मागील भाग
- १. चुंबकीय पट्टीःरूपे किसान कार्डासंबंधी अत्यंत महत्वाची माहिती याठिकाणी
सुत्रबद्ध करण्यात आलेली आहे. कृपया चुंबकीय पट्टीचे खराब होण्यापासून रक्षण करा.
- २.स्वाक्षरीपट्टीः कृपया कार्ड प्राप्त झाल्याबरोबर लगेचच एका बॉल पॉईंट पेन ने
(प्राधान्यत: काळी शाई) स्वाक्षरीपट्टीवर स्वाक्षरी करा.
- ३.सीव्हीडी २: हा एक ३ - आकड़ी क्रमांक कार्डाच्या पाठीमागे स्वाक्षरीपट्टीच्या
तळात उपस्थित आहे. एक वर्धित सुरक्षेचे वैशिष्ट सीएनपी (कार्ड-नॉट प्रेझेंट)
व्यवहारांसाठी. सर्व ई-कॉमर्स व्यवहारांमध्ये संवाद करण्यासाठी कार्डधारकाला हा क्रमांक
आवश्यक आहे.
अटी आणि शर्ती
- १. बँक कोणताही व्यवहार स्विकृत किंवा अस्विकृत करण्याचा अधिकार राखून ठेवते. कार्डधारक
या कार्डाच्या माध्यमातून देण्यात आलेली कोणतीही सुचना नंतर नाकारू शकत नाही.
- २.बँक कार्डासाठी कोणतीही नविन सेवा सुरू करण्याचा आणि अस्तीत्वात असलेली कोणतीही सेवा
जेंव्हा आवश्यक असेल तेंव्हा समाप्त करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे.
- ३.बँक एटीएम आणि पीओएस सेवांच्या शर्ती आणि अटींमध्ये कधीही बदल करण्याचा अधिकार राखून
ठेवत आहे.
- ४. टॅरिफ (आकार) ची रक्कम बदलण्या संदर्भातील सर्व हक्क बँकेकडे राखीव आहे.