दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपले स्वागत करीत आहे.

PFMS -

(पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम)

PFMS - पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम केंद्र शासन व राज्य शासन यांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांद्वारे मिळणारे अनुदान,सबसीडी आणि इतर आर्थिक लाभ लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होणेस्तव आवश्यक असणारी PFMS प्रणाली बँकेने कार्यान्वित केलेली आहे.

CKYC -

(सेंट्रल केवायसी सुविधा)

भारत सरकारच्या CERSAI या संस्थेद्वारे सेंट्रल केवायसी सुविधेचे व्यवस्थापन केले जाते. कोणतेही बँक,म्युचुअल फंड, विमा कंपनी मार्फत सी-केवायसी प्रक्रिया पुर्ण केल्यास ग्राहकाचे सर्व माहिती एकाच सर्वरवर डिजिटल पद्धतीने संग्रहित होते.

MMS-

(मँडेट मॅनेजमेंट सिस्टम)

बँकेच्या कर्जदार ग्राहकांना कर्जाचा हप्ता इतर बँकेतील त्याच्याच सेव्हींग खात्यामधून परस्पर भरण्यासाठी आणि तसेच विमा प्रीमियम, म्युचुअल फंड हप्ता इत्यादि रकमा जिल्हा बँकेतील खात्यामधून नियोजित तारखेस आपोआप वर्ग होण्यासाठी MMS(ECS) सुविधा उपलब्ध आहे.

QR Code-

(क्विक रिस्पॉन्स कोड)

बँकेच्या बचत व चालू खातेदारांसाठी QR कोड द्वारे विविध रकमा स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे.

SMS Alerts -

(एसएमएस अलर्ट सुविधा)

बँकेच्या सर्व खातेदारांसाठी SMS अलर्ट सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेद्वारे ग्राहकांच्या खात्यावर होणारे व्यवहारांबाबत त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर SMS पाठविला जातो.

Cardsafe App -

(कार्ड सेफ मोबाईल ॲप)

बँकेच्या सर्व एटीएम कार्ड धारक ग्राहकांना कार्ड सेफ मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ग्राहक स्वतः आपल्या मोबाईल वरुन एटीएम पिन बदलवू शकतात तसेच व्यवहारांची मर्यादा ठरवू शकतात .